प्रतिनिधी/पेठ वडगाव
वडगाव पालिकेत नगरसेवक व भादोले येथे शाखाधिकारी असलेल्या तरुणाचा व त्याच्या वडीलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दरम्यान दम्याचा त्रास असलेल्या त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांना कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचारास नेण्यात आले होते. मात्र उपचारापुर्वीच पहाटेच त्यांचा मृत्यु झाला.
वडगाव शहरातील नगरसेवक व भादोले येथील बँकेचे शाखाधिकारी म्हणून काम करत असलेल्या या तरुणाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे वडगाव व भादोले येथे खळबळ उडाली आहे. पहाटे चार वाजता पालिका प्रशासनाने या नगरसेवकांचा घर परिसर प्रतिबंधित करून जंतू नाशक फवारणी केली आहे. या कुटूंबाच्या संपर्कातील लोकांची यादी बनविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.