प्रतिनिधी / कोल्हापूर
कुस्ती क्षेत्रातील साऱ्यांचं मन पिळवटून टाकणारी घटना आज घडली. सांगोला तालुक्यातील बामणी येथील महाराष्ट्राच्या मैदानी कुस्ती क्षेत्रातील पै. लव्हाजी साळुंखे याने जगाचा निरोप घेतला. पै.लव्हाजी याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
लव्हाजी याला तालमीत अस्वस्थ वाटू लागल्याने कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.लव्हाजी हा गंगावेश तालीम कोल्हापूर येथे सराव करत होता. त्याच्या जाण्याने तमाम कुस्ती क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लव्हाजी साळुंखे हा महाराष्ट्राच्या मैदानी कुस्ती क्षेत्रातील एक चांगला मल्ल होता.