वारणानगर / प्रतिनिधी
पोहाळे (ता.पन्हाळा) येथील इसम घरात कोणालाही न सांगता निघून गेला. संजय शामराव चव्हाण (वय.५०) असे त्याचे नाव आहे. या बाबतची वर्दी त्यांचा मुलगा सचिन संजय चव्हाण यांनी कोडोली पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संजय हा मंगळवार दि.२९ रोजी सकाळी ६ वाजत ऊसतोडणी करीता जातो असे घरात सांगुन कुठेतरी निघुन गेला त्याचा मित्र व पैपाहुणे यांचेकडे शोध घेतल्या नंतर सापडला नसल्याने आज या बाबतची वर्दी दिली.
संजय याचे वर्णन रंगाने सावळा, अंगाने मध्यम, नाक सरळ, डोळे काळे, केस पांढरे टक्कल पडलेले , उंची अंदाजे ५ फुट ५ इंच , अंगात फुल बाह्याचा पांढरा व लालसर रंगाचा शर्ट व काळे रंगाची पॅन्ट आहे. पुढील तपास पोलीस नाईक कोळेकर करीत आहेत.