प्रतिनिधी / कोल्हापूर
राहता बंगला नावावर करत नसल्याच्या रागातून पत्नीने पतीस शिवीगाळ करुन डाव्या हाताच्या करंगळीचा चावा घेतला. शनिवारी सकाळी 11 वाजता सानेगुरुजी परिसरात ही घटना घडली. जितेंद्र जयसिंगराव भोसले (वय 44 रा. सानेगुरुजी वसाहत) यांनी याबाबतची फिर्याद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. यानुसार वृषाली जितेंद्र भोसले (वय 39 रा. सानेगुरुजी वसाहत) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जितेंद्र व वृषाली हे पती पत्नी आहेत. ते कुटूंबासमवेत सानेगुरुजी येथील स्वप्नकुंज या बंगल्यामध्ये राहतात. शुक्रवारी सकाळी वृषाली यांनी राहता बंगला नावावर का केला नाही अशी विचारणा करत पती जितेंद्र यांच्यासोबत वाद घातला. यानंतर जितेंद्र यांना शिवीगाळ करत सोडणार नाही अशी धमकी देत डाव्या हाताच्या करंगळीचा चावा घेतला. यानंतर जितेंद्र भोसले यांनी याबाबतची तक्रार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली.