प्रतिनिधी/कोल्हापूर
शहरातील राधानगरी रोडवरील विष्णूनगरातील बंद बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यानी 75 हजाराचा ऐवज लंपास केला. यात रोख रक्कमेसह, सोन्याचे दागिणे असा ऐवज लंपास केला. या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे.
विष्णूनगरात प्रदिपकुमार भालचंद्र गोटीखेडीकर यांच्या मालकीचा बंगला आहे. ते आणि त्यांची पत्नी बंगल्यास कुलुप लावून पुणे येथील नातेवाईकाच्याकडे गेले होते. याच संधी फायदा घेत चोरटयानी बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यानी आत प्रवेश केला. बंगल्यातील कपाट फोडून त्यातील रोकड, सोन्याचे मणीमंगळसुत्र, विडीओकॉन कंपनीचा ४० इंची एलइडी टीव्ही, टॉप शेगडी असा सुमारे ७५ हजार रुपये किंमतीचा माल चोरून नेला. ही चोरीची घटना प्रदिपकुमार गोटीखेडीकर बाहेरगावाहून आल्यानंतर उघडकीस आला. या चोरी नोंद जुना राजवाडा पोलीसात झाली आहे.