महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांची माहिती
प्रतिनिधी / कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या बारावी पुरवणी परीक्षा गुरूवार 16 सप्टेंबर तर दहावी पुरवणी परीक्षा 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या ऑफलाईन परीक्षेसाठी परीक्षक, पर्यवेक्षक, संचालक, भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावयाची आहे, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने 16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोंबर दरम्यान बारावीची ऑफलाईन पुरवणी परीक्षा व 22 सप्टेंबर ते 11 ऑक्टोंबर दरम्यान दहावीची ऑफलाईन पुरवणी परीक्षा होणार आहे. कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाच्यावतीने परीक्षेच्या तयारीची युध्द पातळीवर तयारी सुरू आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा तीन जिल्ह्यात 24 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. सकाळच्या सत्रात सकाळी 10.30 वाजता तर दुपारच्या सत्रात दुपारी 3 वाजता पेपर सुरू होणार आहे. तिन्ही जिल्ह्यासाठी 6 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक वर्गात 12 ते 15 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.