प्रतिनिधी / वाकरे
आज पक्षी दिनाच्या निमित्ताने बालिंगा (ता. करवीर )येथे पिंपळाच्या झाडावर पतंगाच्या दोरात अडकलेल्या ब्राम्हण घारीला जीवदान देण्याच काम वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटीचे सदस्य संदीप तोडकर (बालिंगा) यांनी केले. ही घटना रविवारी सकाळी ७ वाजता घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बालिंगा (ता. करवीर) येथील गणेश मंदिराजवळच्या पिंपळाच्या झाडावर पतंगाच्या दोरीमध्ये ब्राम्हण जातीची घार अडकली होती. शनिवारी रात्री प्रयत्न करून घारीला सोडविण्यास अपयश आले. परंतू रविवार सकाळी ७ वाजता प्रयत्न सुरू करून या ब्राम्हण जातीच्या घारीची सुट्का करण्यात यश आले. या घारीची सुटका करण्यासाठी संदीप तोडकर यांच्यासह ग्रा. पं. कर्मचारी रघुनाथ कांबळे, सौरभ बारड, सागर कारंडे, अभिजीत घोडके, निखिल शिंगे, विनायक पाटील (साबळेवाडी) आदींचे सहकार्य लाभले.