प्रतिनिधी / शिरोळ
बेकायदेशीर सुगंधी गुटका तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या एकास अटक करून 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नांदणी ता. शिरोळ येथील रोहित पांडुरंग चव्हाण वय वर्षे 29 हा बेकायदेशीर गुटखा विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांना मिळाली गुरुवार रात्री नऊ वाजता पोलिसांनी धाड टाकून विविध कंपन्याचे सुगंधित पदार्थ वाणी साहित्य व अन्य साहित्य मिळून आले यामध्ये विमल पान मसाला सुगंधी गुटखा 20,320/- व हिरो स्पेंडर मोटरसायकल 40,000/-असा एकूण 60,320 रुपयेचा मुद्देमाल जप्त.. सदर बाबत पोलीस अंमलदार ताहीर मुल्ला यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली.
सदरची कारवाई सहायक पोलिस निरीक्षक शिवानंद कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानदेव सानप, पोलीस अंमलदार ताहीर मुल्ला, गजानन कोष्टी यांनी केली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक सरनाईक हे करीत आहेत.