प्रतिनिधी / शिरोळ
चिंचवाड ता. शिरोळ येथे बेकायदेशीर गावठी दारू विक्री करणाऱ्या एका महिलेसह दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की चिचवाड येथील श्रीमती सुभद्रा अशोक नाईक वय वर्षे 58. ही महिला टेरेसवर बेकायदेशीर देशी दारू विक्री करीत असताना पोलिसांनी धाड टाकत पकडली. यात अठरा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच कनवाड येथील शासन मान्य देशी दारू दुकानदार दादासो भुपाल खटावने याने सदर दारूच्या बाटल्या पुरवठा केल्याच्या कारणावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे.
दादासो खटावणे याने दोन दिवसांपूर्वी हसूर कनवाड हद्दीमध्ये बेकायदेशीर दारु विक्री करण्यासाठी एका इसमाला दिला होता. त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन दोन दिवस उलटले नाही तर पुन्हा चिंचवाड या ठिकाणी बेकायदेशीर दारू पुरवठा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सदरची कारवाई सहायक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदारी सुळ पो हे कॉ डी डी सानप पोलीस नाईक हनुमंत माळी पोलीस कॉन्स्टेबल ताहीर मुल्ला यांनी केली पोलिसांनी अवैद्यधंद्याविरोधात धडक मोहीम सुरू केल्याने बेकायदेशीर व्यवसाय करणारीचे धाबे दणाणले आहे.