प्रतिनिधी / शिरोळ
‘बेटी बचाव बेटी पढ़ाओ’ हा उपक्रम घराघरात पोचण्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी व संबंधितांनी प्रयत्न करण्याचे आवाहन राज्याचे आरोग्य राज्यमंत्री ना राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पोषण अभियान सप्टेंबर महिना हा पोषण माह म्हणून साजरा केला जात आहे. या योजनेअंतर्गत विविध नामफलकाचे अनावरण तसेच ठेव पावतीचे वितरण नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
स्वागत प्रारंभी उपस्थितांचे स्वागत एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले या कार्यक्रमास सभापती कविता चौगुले, उपसभापती सचिन शिंदे, जि. प. सदस्य दादे, पाशा पटेल, माजी सभापती सदस्य मल्लाप्पा चौगुले, पंचायत समिती सदस्य सर्वश्री रूपाली, मगदूम मीनाक्षी कुराड, दिपाली परीट, मीनाज जमादार, तहसीलदार अपर्णा मोरे, गट विकास अधिकारी शंकर कवितके यांच्यासह पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते.