प्रतिनिधी / राधानगरी
राधानगरी तालुक्यातील पिरळपैकी सावर्धन इथल्या पासष्ट वर्षांच्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ मी भविष्य सांगणारा असल्याचे सांगत महिलेला गुंगीत ठेवून एका पंचेचाळीस वर्षांच्या अनोळखी इसमाने लांबवले घटनेची राधानगरी पोलिसात नोंद झाली असून अनोळखी व्यक्तीवर फसवणूक करून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभावती सुरेश एकावडे असं त्या फसवणूक झालेल्या महिलेचं नाव आहे. चोरट्याने गळ्यातील सोन्याची माळ मी भविष्य सांगणारा असल्याचं सांगत महिलेला बोलण्यात गुंतवलं आणि गळ्यातील सोन्याची माळ हातचलाखीने लांबवली,याबाबतची फिर्याद महिलेने स्वतः राधानगरी पोलिस ठाण्यात दिली आहे.
सदरचा चोरटा हा मजबूत बांधा असलेल्या, अंदाजे पाच फूट पाच इंच उंची, अंदाजे 40 ते 45 वय, रंगाने सावळा चेहरा गोल, डाव्या डोळ्यावर मोठे काळे चामकूळ गळ्यात कवड्यांच्या माळा अंगात तांबूस रंगाची पॅन्ट, शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट चप्पल, खांद्यावर पिशवी सोबत काळ्या रंगाची मोटर सायकल आहे. अशा वर्णनाचा इसम आढळल्यास राधानगरी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीधर कोळी पोलीस नाईक बजरंग पाटील यांनी केले आहे.