नगरसेवक परमार यांच्या पुतण्याचा सहभाग
प्रतिनिधी/कोल्हापूर
येथील भेंडी गल्लीमध्ये असलेल्या कोठावळे यांच्या घरात जुगार खेळणाऱ्यांवर राजवाडा पोलिसांनी छापा टाकत पाच जणांना अटक केली. यावेळी पोलिसांनी जुगारातील रोख रक्कम आणि ४ मोबाइल हँडसेट असा सुमारे ४६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कुणाल रणजीत परमार (वय-३१, रा. १५०, सी वॉर्ड, कासार गल्ली, गुजरी), अभिजीत अनिल पेडणेकर (३५,रा. घर नं. २१०, सी वॉर्ड, भेडे गल्ली), विजय रघुनाथ पोवार (४o, रा. २१८०, सी वॉर्ड, सोमवार पेठ), भारत महादेवराव पचिंद्र (५०, रा. ८०७ सी वॉर्ड, रविवार पेठ), गिरीश गुरूनाथ पेडेणेकर (३१, रा. २१०, सी वॉर्ड, भेंडे गल्ली) अशी या अटक केलेल्या पाच जणांची नावे आहेत.
याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी अशी, काल, शनिवारी सायंकाळच्या समारास गुजरी परिसरातील भेंडे गल्ली येथील इंद्रशांती यात्री निवासा नजीक असलेल्या कोठावळे यांच्या घरामागील मोकळया जागेत काही युवक जुगार खेळत असल्याबाबतची माहिती राजवाडा पोलिसांना मिळाली होती. तात्काळ पोलीसांनी भेंडी गल्ली येथील कोठावळे यांच्या घरात छापा टाकून जुगार खेळणाऱ्या पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह मुद्देमाल ताब्यात घेतला. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल संदिप बेंद्रे यांच्या फिर्यादीनुसार पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.