जयसिंगपूर/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान संचालक मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे सेवा सोसायटी मधून समर्थक मतदारांसह फॉर्म भरण्यास रवाना झाले. याआधी जयसिंगपूर येथील फार्म हाऊसवर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये सेवा सोसायटीतील 100 हून अधिक मतदार उपस्थित होते. मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्यास रवाना झाले. यावेळी उपस्थित मतदारांनी डोक्यावर टोपी परिधान करून यड्रावकर यांचा जयघोष करत अर्ज भरण्यासाठी कोल्हापूरकडे रवाना झाले.
दरम्यान, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरोग्य राज्यमंत्री तथा विद्यमान संचालक राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ठराव धारकांच्या साक्षीने शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. वैशिष्ट्यपूर्ण टोप्या परिधान करून 110 ठरावधारक ट्रॅव्हल्स मधून जिल्हा बँकेत दाखल झाले वाद्यांच्या निनादात शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.