महापालिका माजी पदाधिकाऱ्यांची मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारुप मतदार यादीत प्रचंड गोंधळ आहे. यादीवर मोठयाप्रमाणात हरकती दाखल होत आहेत. हरकती घेण्यासाठी प्रशासनाने दिलेला वेळ कमी आहे. त्यामुळे हरकती दाखल करण्यासाठी प्रशासनाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महापालिकेच्या माजी पदाधिकाऱयांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलवकडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रात म्हटले आहे, मतदारी यादीत मोठयाप्रमाणात बदल केल्याने प्रत्येक प्रभागातील इच्छुक अस्वस्थ आहेत. हरकती दाखल करण्यासाठीचा कालावधीही कमी आहे. त्यामुळे हा कालवधी वाढवून मिळावा. तसेच ज्यांनी हरकती घेतल्या आहेत त्यांना दुरूस्तीची प्रत किंवा निकाल अंतिम यादी जाहीर होण्यापुर्वी मिळवा. 2015च्या यादीप्रमाणे सिरियल क्रमांक तपासणी करण्यात यावी अशी मागणी माजी महापौर निलोफर आजरेकर, सरीता मोरे, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, सचिन पाटील, माजी नगरसेवक राहूल चव्हाण, वृषाली कदम, सचिन चव्हाण, प्रकाश गवंडी यांनी केली आहे.
रविवारी 121 हरकती
प्रारुप मतदार यादीवर हरकतींचा पाऊस पडत आहे. रविवारी एकूण 121 हरकती दाखल झाल्या. तर आत्तापर्यंत एकूण 433 हरकती घेण्यात आल्या आहेत. सर्वाधिक 174 हरकती विभागीय कार्यालय क्रमांक 2 शिवाजी मार्केट येथे दाखल झाल्या आहेत.
विभागीय कार्यालयानुसार दाखल झालेल्या हरकती अशा
विभागीय कार्यालय रविवारची हरकत संख्या एकूण हरकती
गांधी मैदान 52 121
छत्रपती शिवाजी मार्केट 30 174
बागल मार्केट 26 87
ताराराणी मार्केट 13 51
एकूण 121 433