प्रतिनिधी / शाहुवाडी
येळाणे तालुका शाहूवाडी गावच्या हद्दीत कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर मलकापूर आगारा नजीक रत्नागिरीला शासकीय धान्य भरावयास निघालेल्या भरधाव ट्रकने ओव्हरटेक करताना चुकीच्या दिशेने येऊन मोटर सायकल स्वरास दिलेल्या धडकेत पेरीड तालुका शाहूवाडी येथील प्रसाद सुनिल कांबळे वय २२ या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर राहुल शामराव धोत्रे वय २३ हा युवक गंभीर जखमी झाल्याची नोंद शाहुवाडी पोलीसांत झाली असून अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला आहे.
पोलिसांकडून व घटना स्थळावरूनमिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरहून रत्नागिरी कडे शासकीय धान्य वाहतूक करणारा ट्रक येत होता तर दुचाकीवरून पेरीड येथील प्रसाद सुनील कांबळे व राहुल शामराव धोत्रे हे दोन युवक आपल्या दुचाकी वरून कोल्हापूरच्या दिशेने जात असता येळाने गावच्या हद्दीत मलकापूर आगारा नजीक भरधाव वेगाने चुकीच्या दिशेला येऊन मोटर सायकलला समोरून धडक दिली या धडकेत प्रसाद कांबळे जखमी झाला तो जागीच ठार झाला तर राहुल धोत्रे यालाही गंभीर दुखापत झाली दोन्ही जखमी युवकांना तातडीने मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे