प्रतिनिधी / शाहुवाडी
मलकापूर शहरालगत असलेल्या शिवारात गव्यांच्या आगमनाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरालगत आलेले गवे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी तर गव्यांना जंगलात घालवण्यासाठी वन विभागासह नागरिकांची ही चांगलीच कसरत करावी लागली.
शहरालगत असलेल्या शिवारातील गव्यांचा कळप मलकापूर मधील शाळी म नामक नदीकिनारी असलेल्या शेतात आला होता.
यावेळी नागरिकांसह शेतकरी वर्गात चांगलीच धावपळ उडाली. गव्यांचा कळप शिवारात येताच वन विभागाशी संपर्क साधून त्यांना हुसकावण्यासाठी नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न केले अखेर वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे वनपाल, आदींसह, मलकापूर नगर परिषदेचे अग्निशामक दलाचे कर्मचारी ,पेरीड ग्रामस्थ यांच्या सहकार्याने गव्यांना हुसकावून लावण्यात वन विभागाला यश आले. या कळपात चार मादी व बछडा असा समावेश होता.