नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय, अनेक वाहतुक मार्गात बदल, पोलीस, शहर वाहतुक शाखेचे नियोजन
प्रतिनिधी / कोल्हापूर
नवरात्रौत्सव काळात करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून मोठयाप्रमाणात भाविक कोल्हापूरमध्ये दाखल होतात. याकाळा वाहनांची वर्दळ वाढत असल्याने वाहतुक कोंडी टाळण्यासाठी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार पोलीस आणि शहर वाहतुक शाखेकडून शहरातील वाहतुक मार्गात बदल करण्यात आले आहेत. मंदिर परिसरातील मार्गांवर रहीवासी, अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता अन्य वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तर निर्माण चौक, छत्रपती शिवाजी स्टेडियम, प्रायव्हेट हायस्कूल मैदान, पेटाळा मैदान येथे पार्कींगचे नियोजन केले आहे.
या मार्गांवर अवजड वाहनांना बंदी
अंबाबाई मंदिराकडे जाणाऱया मार्गांवर सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. सीपीआर हॉस्पिटल, सोन्या मारुती, तोरस्कर चौक, गायकवाड बंगला, गंगावेश, रंकाळा स्टँड, तटाकडील तालीम, तांबट कमान, जुना वाशी नाका, देवकर पाणंद पेट्रोल पंप, देवकर पाणंद चौक, इंदिरासागर चौक, रेसकोर्स नाका, गोखले कॉलेज, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, उमा टॉकीज चौक, रिलायन्स मॉल, फोर्ड कॉर्नर, कोंडाओळ, दसरा चौक आदी मार्गांवर अवजड वाहनांना बंदी असणार आहे.
या ऐकेरी मार्गावरील वाहतुक कायम
भवानी मंडप कमान ते सब जेल बिंदू चौक, बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, वणकुंद्रे भांडी दुकान महाद्वार रोड ते पापाची तिकटी, भेंडे गल्ली रोड हे मार्ग नेहमीप्रमाणे ऐकेरी राहतील.
या मार्गांवर वाहनांना पूर्णवेळ प्रवेश बंदी
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी मंडप, बिनखांबी गणेश मंदीर ते पापाची तिकटी
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गुजरी कॉर्नर, सोळंकी कोल्ड्रींक, प्रथमेश ऑईल स्पेअर पार्ट कॉर्नर ते संघवी हॉस्पिटल, गुंदेशा भांडी दुकान कॉर्नर ते एम.एल.जी. हायस्कूल, बालगोपाल तालीम, वांगी बोळ, कपिलतीर्थ मार्केट, गहहिंग्लज बँक, खोंदे पान शॉप, खांडेकर बोळ, घाटी दरवाजा या मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
लक्झरी, मिनीबस, चारचाकी, दूचाकी पार्कींग याठिकाणी
लक्झरी, मिनीबस ः विविध मार्गांवरुन शहरात येणाऱया लक्झरी, मिनीबसचे बाहेरच्या मार्गांवरुन निर्माण चौक, संभाजीनगर येथे पार्कींगचे नियोजन केले आहे. चारचाकी ः छत्रपती शिवाजी स्टेडियम, प्रायव्हेट हायस्कूल, रावणेश्वर मंदिर रस्ता, पेटाळा मैदान, गांधी मैदान, ताराराणी हायस्कूल मंगळवार पेठ, संध्यामठ परिसर, दसरा चौक, पंचगंगा नदी घाट येथे चारचाकी पार्कींगचे नियोजन केले आहे. दूचाकी ः बिंदू चौक, गांधी मैदान, पेटाळा मैदान, संगीतसूर्य केशवराव भोसले नाटÎगृह येथे दूचाकी पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे.
केएमटी मार्गात बदल
नवरात्रौत्सव काळात बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, माळकर तिकटी ते लुगडी ओळ मार्गावर धावणाऱया केएमटी बसच्या मार्गात बदल केला आहे. या बस बिंदू चौक ते आईसाहेब महाराज पुतळा ते स्वयंभू गणेश मंदीर मार्गे मार्गस्थ होतील.
छत्रपती शिवाजी चौकात रिक्षाचालकांना मनाई
बिंदू चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणाऱया रिक्षांन येथे प्रवाशांना उतरविण्यात मनाई आहे. रिक्षाचालकांनी शिवाजी चौकाच्या अलिकडे अथवा पुढील भागत प्रवाशांना उतरावे, असे आवाहन