प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज प्रभाग आरक्षण सोडत सुरु आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी 11 वाजल्या पासून सोडतीची ही प्रक्रिया सुरु आहे. या आरक्षण सोडतीनंतर इच्छुक उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.
प्रभागाचे आरक्षण पुढीलप्रमाणे :
अनुसूचित जाती महिला आरक्षित प्रभाग – प्रभाग क्रमांक 16 शिवाजी पार्क, प्रभाग क्रमांक 19 मुक्त सैनिक वसाहत, प्रभाग क्रमांक 40 दौलत नगर.
लॉटरी पद्धतीने हे प्रभाग आरक्षित करण्यात आले
प्रभाग क्रमांक 8 भोसलेवाडी कदमवाडी अनुसूचित जाती सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक सात सर्किट हाऊस अनुसूचित जाती सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 62 बुद्ध गार्डन अनुसूचित जाती सर्वसाधारण
प्रभाग प्रभाग सुर्वेनगर अनुसूचित जाती सर्वसाधारण
नागरिकांचे मागास प्रवर्ग प्रभाग
प्रभाग क्रमांक 38 टाकाळा खन माळी कॉलनी, प्रभाग क्रमांक 23 रुईकर कॉलनी, प्रभाग क्रमांक 71 रंकाळा तलाव, प्रभाग क्रमांक 13 रमणमळा प्रभाग, क्रमांक 22 विक्रम नगर, प्रभाग क्रमांक 18 महाडिक वसाहत, प्रभाग क्रमांक 24 साईक्स एक्स्टन्शन
सोडतीनंतर लगेच प्रभागाचा आराखडा प्रसिध्द करण्यात येणार आहे. 23 डिसेंबर ते 4 जानेवारी 2021 या काळात हरकती, सूचना घेण्यात येणार आहेत. 6 जानेवारीला हरकती, सूचना महापालिकेचा अभिप्राय राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरु होणार आहे.