प्रतिनिधी / कोल्हापूर
महापालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी काढण्यात आलेल्या प्रभाग आरक्षण सोडतीनंतर अनेक दिग्गजांना आपले हक्काचे प्रभाग आरक्षण पडल्याने गमवावे लागले आहेत. काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित उर्फ नाना कदम, राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील, माजी उपमहापौर विलास वास्कर, माजी स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, माजी नगरसेवक भूपाल शेटे, राहुल माने, प्रतापसिंह जाधव, उमा इंगळे, सुरेखा शहा, वृशाली कदम यांच्या प्रभागावर आरक्षण पडल्याने या सर्वांना यंदाच्या निवडणुकीत थांबावे लागणार आहे किंवा शेजारच्या सुरक्षित प्रभागातून लढावे लागणार आहे. त्याचबरोबर महिला आरक्षण पडले असल्यास घरातील महिला सदस्यांना रिंगणात उतरावे लागणार आहे. दरम्यान, आरक्षणानंतर अनेकांना लॉटरी लागली असून गेली अनेक वर्षे आरक्षणामुळे थांबावे लागलेल्या इच्छुकांनाही आता लढण्याची संधी मिळाली आहे.
आरक्षण सोडतीनंतर शहरातील 81 प्रभागांचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले. काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांचा प्रभाग क्रमांक 71 रंकाळा तलाववर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला अर्थात ओबीसी महिला प्रवर्गाचे आरक्षण पडल्याने त्यांना हक्काचा प्रभाग शोधावा लागणार आहे. शेजारच्या सानेगुरूजी प्रभाग क्रमांक 74 मधून ते लढण्याची शक्यता आहे. भोसलेवाडी-कदमवाडी प्रभाग क्रमांक 8 अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांना हक्काच्या मतदार संघावर पाणी सोडावे लागणार आहे. पण शेजारचा कदमवाडी प्रभाग 9 हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला असल्याने कदम यांना तेथून लढण्याची संधी आहे.
राष्ट्रवादीचे गटनेते सुनील कदम यांचा प्रभाग क्रमांक 67 रामानंदनगर-जरगनगर अनुसुचित जाती महिलासाठी आरक्षित झाला आहे. माजी उपमहापौर विलास वास्कर यांचा दौलतनगर प्रभाग क्रमांक 40 अनुसुचित जाती महिलासाठी आरक्षित झाल्याने वास्कार दुसरा प्रभाग शोधणे किंवा थांबणे यापैकी एक निर्णय घ्यावा लागणार आहे. राजारामपुरी प्रभाग क्रमांक 36 यंदाच प्रथमच बऱयाच वर्षांनी एसीचा ओबीसी महिला प्रभाग झाल्याने माजी स्थायी समिती सभापती संदीप कवाळे यांना बेक लागला आहे. त्यांना पर्यायी प्रभाग शोधावा लागणार आहे. त्याचबरोबर भूपाल शेटे यांनाही जवाहर नगर प्रभाग सर्वसाधारण महिला झाल्याने इतर प्रभागातून उतरावे लागणार आहे किंवा पत्नीला उभे करण्याचा पर्याय त्यांच्यापुढे आहे. राहुल माने, प्रतापसिंह जाधव, उमा इंगळे, सुरेखा शहा, वृशाली कदम यासारख्या दिग्गजांना प्रभागावर आरक्षण पडल्याचा फटका सहन करावा लागणार आहे.
कसबा बावडÎातील सर्व सहा प्रभाग ओपन
पालकमंत्री सतेज पाटील यांचा बालेकिल्ला असणाऱया कसबा बावडÎातील 1 ते 6 हे प्रभाग सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिलांसाठी खुले झाल्याने उमेदवारांसाठी चुरस निर्माण होणार आहे. शुगरमिल प्रभागात तब्बल 25 वर्षे नगरसेवकपद भूषविणाऱया बुचडे घराण्याला यंदा थांबावे लागणार आहे. हा प्रभाग ओपन झाला आहे. सुभाष बुचडे, वंदना बुचडे, मनिषा बुचडे यांनी याआधी प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच वंदना बुचडेंना महापौरपद मिळाले होते.