– शववाहिका, स्मशानभूमी, अग्निशमन दलाचे उल्लेखणीय काम
विनोद सावंत/कोल्हापूर
कोरोनाच्या संकटात महापालिकेतील हजारो कर्मचारी नॉनस्टॉप राबत आहेत. अग्निशमन दल, शववाहिका, स्मशानभूमी, हॉस्पिटल, कोरोना केअर सेंटर या विभागांचा यामध्ये समावेश आहे. येथील कर्मचारी सलग सव्वा वर्ष जीवाची पर्वा न करता ऑनड्यूटीवर आहेत. यामधील काहींना साप्ताहिक सुट्टीही मिळालेली नाही.
एकीकडे कोरोनामुळे खासगी, सरकारी कार्यालयातील कर्मचाऱयांची संख्या 25 टक्के केली आहे. काही विभागांनी तर वर्कफॉर होम सुरू केले आहे. दुसरीकडे कोल्हापूर महापालिका मात्र, जीवाची बाजी लावून नागरीकांच्या सेवेत आहे. येथील हजारो कर्मचारी विविध कामानिमित्त रस्त्यावर आहेत. यामधील काही विभाग 24 तास सेवा बजावत आहेत. वाढलेले काम आणि अपुरे कर्मचारी यामुळे काहींना डब्बल डÎूटी करण्याची वेळ येत आहे.
शववाहिकेवरील कर्मचारी 24 तास ड्यूटीवर
कोरोनाचा मृतदेह म्हटले की दोन हात लांब असेच चित्र असते. कोरोनाने मृत झाल्यास परिसरातील कोणीही पुढे येत नाही. या उलट शववाहिकेतील कर्मचारी जीवाची पर्वा न करता मृतदेह दहनासाठी स्मशानभूमीमध्ये नेण्याचे काम करत आहेत. रोज 50 पेक्षा जास्त वर्दी येत असून शहरसह शहरालगतच्या हॉस्पिटलमधून कोरोना मृतदेह पंचगंगा स्मशानभूमीत नेण्याचे काम गेल्या सव्वा वर्षापासून 24 तास सुरू आहे.
स्वच्छतेसाठी 1550 सफाई कर्मचारी रस्त्यावर
कोरोनात लॉकडाऊनमध्ये नागरिक घरात असताना महापालिकेचे 1550 सफाई कर्मचारी स्वच्छतेसाठी रोज रस्त्यावर असतात. यामध्ये झाडू, सफाई कर्मचाऱयांचा समावेश आहे. तसेच टिपर, आरसी वाहनांवरील कर्मचारीही प्रत्येक प्रभागातील कचरा संकलित करून झुम प्रकल्प येथे प्रक्रियासाठी नेत आहेत.
स्मशानभूमी अजुनही धगधगतीच
महापालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीसह बापट कॅम्प, कदमवाडी, कसबा बावडा येथे मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. सध्या पंचगंगा स्मशानभूमी कोरोना मृतदेहांसाठी आरक्षित आहे. येथे 21 कर्मचारी रात्रदिवंस अंत्यसंस्काराचे सेवा बजावत आहेत.
पाणीपुरवठा विभागाचीही चोख कामगिरी
शहरातील सुमारे सहा लाख लोकांची पिण्याची पाण्याची सोय करण्याचे काम महापालिकेतील पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी करत आहेत. कोरोना संकटातही पाणी सोडणे, गळती काढणे, मीटर तपासणीचे काम सुरू आहे.
25 टक्के हजेरीला महापालिका अपवाद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयामध्ये 25 टक्के हजेरी ठेवण्याचे आदेश होते. महापालिका याला अपवाद आहे. महापालिकेतील अत्यावश्यक सेवेतील हजारो कर्मचारी, अधिकारी गेले सव्वा वर्ष रात्र दिवस काम करत आहेत. –सुधाकर चल्लावाड, कामगार अधिकारी, महापालिका
ऑनडÎूटीवरील कोरोना योद्धा
विभाग कर्मचारी
झाडू कामगार 1300
सफाई कर्मचारी 250
अग्निशमन दल 150
स्मशानभूमी 70
आरोग्य विभाग 600
कोविड सेंटर 300
टिपर 208
पाणीपुरवठा 150
महापालिकेच्या हॉस्पिटलचा गौरगरींबाना आधार
महापालिकेचे आयसोलेशन हॉस्पिटल, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, पंचगंगा हॉस्पिटलसह 11 प्राथमिक आरोग्य केंद्र कोरोना संकटात गौरगरींबाना आधार ठरत आहेत. सावित्रीबाई फुले हॉस्पिटल नॉन कोविड रूग्णांवर उपचारासाठी राखीव आहे. 14 कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोनावर मोफत उपचार दिला जात आहे.