प्रतिनिधी / कोल्हापूर
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने शनिवरी शहरातील प्रेक्षणीय स्थळे, वारसा स्थळे या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत दोन टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनखाली झालेल्या या मोहिमेत उपायुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, संदीप घार्गे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता नारायण भोसले, बाबूराव दबडे, पर्यावरण अभियंता आर. के. पाटील यांच्यासह माजी नगरसेवक ईश्वर परमार, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. या स्वच्छता मोहिमेत 1 जेसीबी, 2 डंपर, 4 ट्रक्टर ट्रॉली, 3 आरसी गाडया, 4 औषध फवारणीचा वापर करण्यात आला. यावेळी विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर व सर्व आरोग्य निरिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
या ठिकाणी राबविली मोहीम
स्वच्छता मोहिम महालक्ष्मी मंदिर परिसर, गांधी मैदान परिसर, संपूर्ण महाद्वार रोड, रंकाळा परिसर, संभाजीनगर ते देवकर पाणंद, शालिनी पॅलेस, खासबाग मैदान परिसर, रामनंदनगर, बालाजी पार्क, शाहू समाधी स्थळ, पापाची तिकटी परिसर, पंचगंगा नदीघाट परिसर, गंगावेश, उत्तरेश्वर परिसर, शिवाजी विद्यापीठ मेनरोड, प्रतिभानगर, कोटीतीर्थ तलाव परिसर, टाकाळा खण परिसर, मध्यवर्ती बसस्थानक परीसर, रेल्वे स्टेशन, ताराबाई पार्क, न्यू पॅलेज परिसर, टेंबलाईवाडी