प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापूर महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत.पण ही निवडणूक पुढे जाणार असल्याची चर्चा शनिवार पासून सुरु आहे.यामुळे काही जणांमध्ये घालमेल सुरु झाली आहे तर काही जण तयारीला वेळ मिळणार म्हणून सुखावले आहेत.मात्र निवडणूक लांबण्याच्या शक्यतेला महापालिकेच्या अधिकाऱयांकडून दुजोरा मिळाला नाही.
कोल्हापूर महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक ऑक्टोबर 2019 मध्ये होऊन नवीन सभागृह अस्त्वात येणे अपेक्षित होते.पण कोरोना महामारीमुळे सर्व चित्र बदलून गेले.संपूर्ण जिल्हÎाचे लक्ष या निवडणूकीकडे आहे.इच्छुक तर निवडणूकीची तारीख जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.डिसेंबर महिन्यात प्रभाग आरक्षण सोडत झाली.यानंतर मनाप्रमाणे आरक्षण झाले त्यांनी मोर्चे बांधणी सुरु केली तर आरक्षणामुळे संधी हुकते आहे अशा इच्छुकांनी अन्य प्रभागातून चाचपणी सुरु केली आहे.
प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर लवकरच निवडणूकीची तारीखही जाहीर होईल अशी शक्यता आहे.पण दोन दिवसापासून निवडणूक लांबणीवर पडण्याच्या शक्यतेची चर्चा सुरु आहे.कोल्हापूरसह राज्यातील अन्य काही महापालिकेचीही निवडणूक होत आहे.तसेच सहकारी संस्थांच्या सुध्दा निवडणूका आहेत.यामुळे पहिल्या टप्यात मोठÎा महापालिका आणि सहकारी संस्थांच्या निवडणूका घेण्याचे नियोजन निवडणूक आयोगाकडून सुरु असल्याची चर्चा आहे.यामुळे इच्छुकांमध्ये घालमेल सुरु आहे तर काहीजण तयारीला वेळ मिळणार म्हणून आनंदात आहेत.याबाबत महापालिकेच्या संबंधित अधिकाऱयांशी संपर्क साधला असता त्यांनी महापालिकेकडे निवडणूक पुढे जाण्यासंबंधी कोणतीही लेखी सूचना मिळाली नसल्याचे स्पष्ट केले.