प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हय़ात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्हय़ात 20 जुलैपासून लॉकडाऊन घोषित केला आहे. यामुळे आज सोमवारी आयोजित करण्यात आलेली महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. महापौर निलोफर आजरेकर यांनी सभा तहकूब झाल्याचे घोषित केले.