`लाचलुचपत’ची कारवाई, सोलरला परवानगीसाठी घेतली 6 हजारांची लाच, गत आठवडÎातच भ्रष्टाचारमुक्तची घेतली होती शपथ
प्रतिनिधी / कोल्हापूर
घरगुती सोलर सिस्टीम बसविण्यास परवानगी देण्यासाठी 6 हजारांची लाच स्वीकारणाऱया महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास शुक्रवारी जेरबंद केले. आबासाहेब परशराम मांडके (वय 52 रा. अयोध्या अपार्टमेंट, एस. टी. कॉलनीजवळ, ताराबाई पार्क) असे त्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही कारवाई केली. गत आठवडÎातच सर्व शासकीय कार्यालयात भ्रष्टाचारमुक्तची शपथ घेतली होती. यात महावितरण कार्यालयाचाही समावेश होता. अन् दोनच दिवसांत लाचखोरीचे प्रकरण घडल्याने खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांच्या वडिलांचे सोलर सिस्टीम विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानातून एका गिऱहाईकाने घरगुती 10 किलो वॅट सोलर सिस्टीमची खरेदी केली होती. ही सिस्टीम बसविणे तसेच त्यातून तयार होणारी वीज महावितरण कार्यालयास देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची परवानगी आवश्यक असते. यासाठी तक्रारदारांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता आबासाहेब मांडके याच्याकडे गुरुवार (5 नोव्हेंबर) रोजी रितसर अर्ज केला होता. मांडके याने 1 किलो वॅटसाठी 600 रुपये प्रमाणे 10 किलो वॅटचे 6 हजार रुपये द्यावे लागतील. ही रक्कम दिल्यानंतरच तुमचे काम मंजूर केले जाईल, नाहीतर परवानगी देणार नाही असे सांगितले. यानंतर तक्रारदाराने शुक्रवारी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून याबाबतची रितसर तक्रार दाखल केली.
लाचलुचपत विभागाच्या पथकाने शुक्रवारी सकाळी नागाळा पार्क येथील एम.एस. ई. बी. उत्तर विभाग कार्यालयामध्ये सापळा रचला. तक्रारदाराने मांडकेची भेट घेतली. यावेळी 6 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाने मांडकेला जेरबंद केले.
लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, सहाय्यक फौजदार शाम बुचडे, पोलीस कॉन्स्टेबल अजय चव्हाण, मयुर देसाई, रुपेश माने, संदीप पडवळ, विष्णू गुरव यांनी ही कारवाई केली.
शपथ ग्रहण विधीचा विसर
लाचलुचपत विभागाच्या वतीने गत आठवडÎामध्ये सर्व शासकीय कार्यालयामध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले होते. या सप्ताहांतर्गत भ्रष्टाचार करणार नाही, अशी शपथ घेण्यात आली होती. महावितरण कार्यालयामध्येही अशी शपथ घेण्यात आली होती. मात्र सप्ताह संपल्यानंतर दोनच दिवसांत महावितरण कार्यालयाचे वर्ग 1 अधिकारीच लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले. दोनच दिवसांत `मी भ्रष्टाचार करणार नाही… मी लाच स्वीकारणार नाही’ या शपथेचा अधिकाऱयांचा विसर पडल्याचे या कारवाईवरुन दिसले.
गत दहा महिन्यात `वर्ग 1′ चे पाच अधिकारी जेरबंद
लाचलुचपत विभागाने 10 महिन्यात 22 यशस्वी सापळ्यांचे रचले. यामध्ये वर्ग 1 च्या पाच अधिकाऱयांना लाचलुचपत विभागाने जेरबंद केले. वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा परिषद बांधकाम उप-अभियंता, मंडळ अधिकारी, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, जलसंधारण अधिकारी यांचा समावेश आहे.