वार्ताहार / गोकुळ शिरगाव
वीरेंद्र पाटील (वय 33) हा दोन ऑगस्ट रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याने के. टी. कॉलेजकोविड सेंटर येथील सेंटरमध्ये उपचार घेऊन आपला 21 दिवसांचा कालावधी पूर्ण करून तो ठणठणीत बरा होऊन आल्यानंतर त्याने प्रथम ‘अर्पण ब्लड बँक लक्ष्मीपुरी’ या ठिकाणी पहिला आपला प्लाझ्मा दिला. त्यानंतर त्याने दुसरा प्लाझ्मा 7 ऑक्टोंबर रोजी ‘जीवनधारा ब्लड बँक’ राजारामपुरी याठिकाणी त्यांनी दिला. या तरुणाने दोन वेळा प्लाझ्मा दिल्याने नक्कीच आणखीन दोन जीवांना जीवदान मिळणार आहे.
वीरेंद्र हा सर्वसामान्य कुटुंबातील असून तो सातत्याने नेहमी वेगवेगळ्या समाजकार्यात राहिलेला आहे. पॉझिटिव्ह आल्यानंतर तो पूर्ण बरा झाल्या नंतर आपण प्लाज्मा दिल्याने पुढचा कोविडचा असणारा पेशंट आपल्या प्लाझ्मामुळे बरा होणार असेल तर आपण नेहमी आनंदाने प्लाझ्मा दान करू असे त्याने यावेळी सांगितले. या उपक्रमाचे त्याचे गोकुळ शिरगाव, कणेरी, कणेरीवाडी या परिसरात वीरेंद्र पाटील यांचे कौतुक होत आहे.