वार्ताहर / यड्राव
नवीन व्यवसायासाठी बाहेर होऊन दहा लाख रुपये घेऊन ये तसेच घटस्पोटाच्या कागदपत्रांवर सह्या केल्या नाहीत म्हणून पतीकडून पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शहापूर येथील गायबान पेट्रोल पंपाच्या पाठीमागे घडली याप्रकरणी पती विनय सत्यनारायण राठी याच्याविरोधात पत्नी मयुरी राठी वय वर्षे २७ हिने शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
शहापूर येथील गायबान पेट्रोल पंपाच्या पाठीमागे एमजी मार्केट जवळ विनय व मयुरी हे पती-पत्नी राहतात लग्नानंतर काहीच दिवसात पती विनय याने व्यवसायासाठी दहा लाख रुपये माहेरून घेऊन ये तसेच लग्नात सांसारिक साहित्य दिले नाही म्हणून पत्नी मयुरीला तगादा लावून वारंवार उपाशी ठेवून मारहाण करीत असे तसेच पती विनय याने संजय तेलनाडे यांच्या नावाची धमकी देऊन मी संजय तेलनाडे यांचा उजवा हात आहे तू मला पैसे दिले नाहीस तर तुला व तुझ्या वडिलांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देऊन शारीरिक व मानसिक छळ करीत होता दिनांक २५ जानेवारी रोजी घरात घटस्फोटाच्या कागदपत्रावर पत्नी मयूरी तिने सह्या केल्या नाहीत म्हणून तिच्या अंगावर बसून दोन्ही हाताने गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता एडवोकेट पवन कुमार उपाधे यांच्या कार्यालयाजवळ येऊन घटस्फोटाच्या कागदपत्रावर गप्प सह्या कर नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून तिला ढकलून देऊन अश्लील शिवीगाळ व मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे