शिवाजी पार्क परिसरातील एका रुग्णालयातील प्रकार ; चार तोळ्याच्या बांगडय़ा लंपास
प्रतिनिधी/कोल्हापूर
शिवाजी पार्क परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या 65 वर्षे वयाच्या मृत वृद्धेच्या अंगावरील दागिन्यांवरील चार तोळ्याच्या बांगडय़ावर चोरटय़ांनी डल्ला मारला. माणुसकीला काळीमा फासणाया या घटनेबद्दल शहरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांवर गुन्हा दाखल झाला आहे.
आर. के. नगर परिसरात राहणाया एका 65 वर्षाच्या वृद्ध महिलेस त्यांच्या नातेवाईकांनी शिवाजी पार्क परिसरातील एका खासगी रुग्णालयात 12 जुलै रोजी दाखल केले होते. उपचार सुरू असताना या वृद्धेचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्या हातात असणाया चार तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगडय़ा मृतदेहाच्या अंगावरून अज्ञात चोरटय़ाने काढून घेतल्या. हा प्रकार नातेवाइकांच्या लक्षात आला. याबाबत त्यांनी रुग्णालय प्रशासनाला माहिती दिली होती. त्यानंतर वृद्धेचा मृतदेह घेऊन नातेवाईक निघून गेले. सर्व सोपस्कर उरकल्यानंतर दहा ते बारा दिवसानंतर नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे चौकशी केली. मात्र त्यांच्या चोरीस गेलेल्या बांगडय़ा मिळाल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी गुरुवारी दुपारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. मृतदेहावरील सोन्याचे दागिने कोणी काढून घेतले. याबाबत पोलिस तपास करीत आहेत. माणुसकीला काळीमा फासणाया या प्रकाराने संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार होळी हे तपास करीत आहेत