भोगावती/प्रतिनिधी
येळवडे ता राधानगरी गावाजवळ मोटारसायकल व मालवाहू टेंपो यांच्यात समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात पुंगावचा दुचाकीस्वार शिवाजी दत्तात्रय कुलकर्णी वय ५८ हे जागीच ठार झाले.आरे पिरळ मार्गावरील येळवडे गावच्या हद्दीतील सारजाईचा ओढा येथे गुरुवारी सकाळी ही दुर्घटना घडली.मयत कुलकर्णी हे कामानिमित्त राशिवडे गावाकडे येत होते.तर टेंपो कसबा तारळे येथील आठवडा बाजारासाठी जात होता.