प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी, म्युकर मायकोसीसने सीपीआर हॉस्पिटलमध्ये दोघांचा मृत्यू झाला, तर 3 नवे रूग्ण दाखल झाले. तसेच म्युकरमुक्त 10 जणांना घरी पाठवण्यात आले.
शहरातील सीपीआरमध्ये मंगळवारी म्युकर मायकोसीसने दोघांचा मृत्यू झाला तर 3 नवे रूग्ण दाखल झाले. सीपीआरमधून 10 जणांना डिसचार्ज देण्यात आला, सध्या सीपीआरमध्ये 81, खासगी हॉस्पिटलमध्ये 50 म्युकर रूग्णांवर उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीत 131 रूग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यत म्युकरने 44 जणांचा मृत्यू झाला आहे तर 62 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती डॉ. हर्षला वेदक यांनी दिली.