दोन कर्मचारीही बाधित, अँटीजेन टेस्टमधून स्पष्ट
प्रतिनिधी / कोल्हापूर
मंगळवार पेठ, पाण्याचा खजिना येथील बाल कल्याण संकुलमधील 14 मुली आणि 2 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले. महापालिकेच्यावतीने रविवारी संकुलमध्ये जाऊन अँटीजेन टेस्ट केल्यानंतर हे स्पष्ट झाले. यानंतर खळबळ उडाली आहे.
येथील व्यवस्थापनाने वेळीच तपासणी केल्यामुळे मोठा धोक टळला. 100 जणांची अँटीजेन टेस्ट केली. यामध्ये 84 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. पॉझिटिव्ह रूग्णांना शिवाजी विद्यापीठ डीओटी वस्तीगृह येथे उपचारासाठी दाखल केले आहे.