ऑनलाईन टीम / कोल्हापूर
कोल्हापूर रेल्वे स्टेशन येथे रेल्वेच्या प्रवाशी डब्याला लागली आग असल्याची माहिती समोर आली असुन काल दि. ५ डिसेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. यावेळी रेल्वे डबा रीकामे असल्याने जीवित हाणी झाल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र आग लागली असल्याचे समजताच आग 3 फायर फायटर ने विझवली असे एम एच 09 इडब्यु 6568 फायर फायटर, एम एच 09 एल 6560 फायर फायटर,MH 09 BC 1628 फायर फायटर च्या मदतीने आग विझवण्यास यश आले आहे.
यावेळी उपमुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे सो व प्रभारी स्थानाचा अधिकारी कांता बांदेकर सो हजर होते. तर फायरमन प्रमोद मोरे, अवधुत, विजय सुतार, संग्राम पाटील नवनाथ साबळे यांनी ही महत्त्वाची भुमिका बजावली आहे.