सहा महिला व तिघा युवकांना अटक, सुमारे 20 हजाराचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी/कोल्हापूर
राजेंद्रनगरामध्ये सुरु असलेल्या महिलांच्या बल्लारी ( अंदर बाहर ) जुगार अडयावर पोलिसांनी छापा टाकला. अड्डा मालक महिलेसह सहा महिला आणि तीन युवक अशा नऊ जणाना अटक केली. यावेळी पोलिसांनी 11 हजार 940 रुपयांची रोकड, चार मोबाईल संच, जुगाराचे साहित्यासह 20 हजार 940 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
भिंगरी अविनाश सकट ( वय40), पिंकी विशाल सकट (50, दोघी रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर), सुरेखा रामु नरंदे (35, रा. टेबलाईनाका), हेमा रविंद्र कसबेकर (40, रा. राजारामपूरी 14 वी गल्ली, माऊलीच्या पुतळ्याजवळ, राजारामपूरी), लता राजेश उपाळे (40, रा. संभाजीनगर, पेट्रोलपंप जवळ, कोल्हापूर), लक्ष्मी हिराचंद्र राख (45, दोघी रा. संभाजीनगर , पेट्रोलपंप जवळ, कोल्हापूर), सुनिल संभाजी जाधव (38, रा. टेंबलाईनाका), योगेश दगडु भांगरे (25 ), संतोष कमलाकर गायकवाड ( 27, दोघे’ रा. जोशीनगर , संभाजीनगर, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधी राजारामपूरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, राजेंद्रनगरातील बाळु बसवंत सकट याच्या पत्र्याचे सेडमध्ये महिलांचा बल्लारी ( अंदर बाहर ) नावाचा अवैध जुगार अड्डा सुरु आहे. याबाबतची माहिती राजारामपूरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला माहिती मिळाली होती. त्यानुसार या जुगार अडयावर गुन्हे शोध पथकाने दुपारी छापा टाकला. यावेळी या पथकाला जुगार खेळणाऱ्या सहा महिलासह तीन युवक असे नऊ जण मिळून आले. यामध्ये या जुगार अड्डा मालकीन पिंकी सकट या महिलेचा समावेश आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 11 हजार 940 रुपयांची रोकड, चार मोबाईल संच, जुगाराचे साहित्यासह 20 हजार 940 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत हवालदार सिध्देश्वर केदार यांनी फिर्यादी दिली आहे.