प्रतिनिधी / कोल्हापूर
राजेंद्रनगर साळोखे पार्क येथे आज दि. ७ मार्च रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरगुती गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये भाजून एक जण जखमी झाला तर स्लॅब कोसळून ढिगाऱ्याखाली सापडून एकजण जखमी झाला. याच्या स्फोटात जखमी झालेल्याचे कुमार लाटवडे वय बत्तीस असे नाव आहे तर राजू सोनूले हे हे ढिगाऱ्याखाली सापडून जखमी झाले. लाटवडे कुटूंबातील कुमार लाटवडे वेदांत लाटवडे सुजाता लाटवडे नियती लाटवडे आदिती लाटवडे यांना सीपीआरमध्ये दाखल केले आहे. त्यांच्या शेजारी राहणारे साहिल गुलेर यांच्या घराची भिंत पडून आणि स्लॅब खाली येऊन नुकसान झाले आहे.
सर्व नवले यांच्या घराचेही मधली भिंत कोसळून स्लॅब खाली आला आणि मोठे नुकसान झाले. स्लॅब अंगावर कोसळूनही सुदैवाने सोनवले आणि त्यांची पत्नी वैशाली सोनवणे हे दोघे बचावले आहेत. रमेश गोपू टकले किरण विकास कांबळे अमोल कांबळे या स्थानिक तरुणांनी त्यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. यानंतर साडेसात वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत घटनास्थळी सकाळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.