प्रतिनिधी / पेठ वडगाव
वाठार तर्फ वडगाव (ता.हातकणंगले) गावचे ग्रामविस्तार अधिकारी अशोक भोसले यांचा कोरोनाने मृत्यू झाला. पुणे-बंगळूर महामार्गालगतचे गाव म्हणून वाठार गावात कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात वाठार गाव कोरोना संसर्गापासून दूर राहिले होते.
गेल्या दोन महिन्यात मात्र या गावात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. ग्रामसेवक भोसले हे बावडा येथील रहिवासी आहेत. ते ग्रामसेवक पतसंस्थेचे संचालकही होते. घुणकी व वाठार गावचे ग्रामविस्तार अधिकारी म्हणून त्यांचेकडे कार्यभार होता. त्यांच्या मृत्यूने वाठार, घुणकी परिसरात व जिल्ह्यातील महसूल विभागात हळहळ व्यक्त होत आहे.