मुलगी आणि सासू, सासरांना ठार मारण्याची दिली धमकी
राजेंद्र होळकर / कोल्हापूर
ताराबाई पार्क परिसरात एका युवकाने पत्नीने वाढदिवसा दिनी शुभेच्छा न दिल्याच्या रागातून पत्नीला शिवीगाळ करीत, हॉकी स्टीकने बेदम मारहाण करुन जखमी केले. तसेच मुलगी आणि सासू, सासराना ठार मारण्याची दिली धमकी दिल्याची घटना घडली आहे. याची नोंद पोलिसांत झाली आहे.
मेघा अशोक जाधव (वय ३२, रा. शिवगंगा हॉस्टेल, ताराबाई पार्क, कोल्हापूर) असे जखमी महिलेचे नाव आहे. तर प्रणव मिलींद देशपांडे (मुळ रा. सरकारी घाट, सांगली, सध्या रा.कसबा बावडा, कोल्हापूर) असे मारहाण करणाऱ्या तिच्या पतीचे नाव आहे. त्याच्याविरोधी शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांच्याकडून समजलेली माहिती अशी, जखमी मेघा जाधव आणि तिचा पती व संशयित आरोपी प्रणव देशपांडे या दाम्पत्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून वैवाहिक कारणावरुन वाद निर्माण झाला आहे. १० सप्टेंबरला प्रणव यांचा वाढदिवस होता. या दिवशी जखमी मेघाने त्याला वाढदिवसानिमित्याने शुभेच्छा दिल्या नाहीत. याचा राग मनात धरुन त्याने पत्नी मेघाला शिवीगाळ करीत, हॉकी स्टीकने बेदम मारहाण करुन जखमी केले.
तसेच जखमी मेघाच्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलगीला आणि तिच्या आई-वडीलांना ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मेघाने पती प्रणव देशपांडे विरोधी शाहुपूरी पोलिसात फिर्याद दिली आहे.