अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांची घोषणा
म्हैस दूधासाठी प्रतिलिटर २ रुपये १० पैसे
प्रतिनिधी / वारणानगर
येथील वारणा सहकारी दूध संघाकडून दिवाळीसाठी दूध फरक बील, कामगारांना पगार व बोनस अशी तब्बल ३० कोटी रुपये देणार असल्याची घोषणा वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी दिली.
वारणा दूध संघाच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतला असल्याची माहीती डॉ.कोरे व श्री.येडूरकर यांनी दिली. कोवीड-१९ या महामारीच्या काळात दूध वितरण,पदार्थ निर्मिती,मिठाई इ.विक्रीवर गंभीर परिणाम झाला पण संघाने दूध उत्पादकांचे दूध संकलन करून त्यांना साथ दिली.संघाने आपले कामकाज अंत्यंत काटकसरीने केल्यामुळे दूध उत्पादकांना फरक बील, कामगारांना पगार व बोनस देता येणार आहे. तसेच सभासदांना सण – उत्सवाच्या निमित्ताने श्रीखंड,तूप वाटप करून दूध उत्पादक व सभासदांना सहकार्य केले.दूध उत्पादकांना पशूखाद्य अशा विविध योजनांसाठी अनुदान देखील दिले आहे.
सध्या कोवीड-१९ प्रादुर्भावामुळे देश आर्थिक संकटात सापडला असताना वारणा दूध संघाने मात्र
अशा काळात दूध उत्पादक,सभासद, कामगारांचा पगार वेळेत देण्याचे काम केले.
वारणा दूध संघ व संघाशी संलग्न असणाऱ्या तात्यासाहेब कोरे दूध – साखर, वहातूक संस्था,सावित्री महिला औद्योगिक संस्था,अमृत सेवक पतसंस्था व डॉ.आर.ए. पाटील सहकारी पतसंस्था यांच्या कर्मचाऱ्यांनाही लाभ मिळणार आहे. म्हैस दूधासाठी प्रतिलिटर २ रुपये १० पैसे फरकबील देण्यात येणार आहे.
वारणा दूध संघाच्या जत (जि.सांगली) येथील दूध उत्पाकांना प्रथमच दिवाळीला फरक बील सध्या जत तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांचे सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामूळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला.या पार्शभूमीवर वारणा दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून या वर्षी प्रथमच फरक बील देण्याचा निर्णय घेतला असल्याच अध्यक्ष विनय कोरे व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सांगीतले. फरक बील दि. २६ ऑक्टोबरपासून उत्पादकांचे खात्यावर जमा होईल.
यावेळी मुख्य अकौटंस मँनेजर सुधीर कामेरीकर,संकलन व्यवस्थापक अर्चना करोशी, मार्केटिंग अधिकारी अनिल हेर्ले आदी उपस्थित होते