आतंरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचा शिल्पकार हरपला
प्रतिनिधी / वारणानगर
वारणानगर येथील श्री.वारणा व्यायाम मंदीराचे वस्ताद व श्री. तात्यासाहेब कोरे कुस्ती प्रशिक्षण केद्राचे प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे शिल्पकार प्रकाश राजाराम पाटील वय ५८ मुळगांव कांदे ता. शिराळा जि. सांगली याचे आज कोरोनाने उपचारा दरम्यान कोल्हापूरात निधन झाले.
पै.प्रकाश पाटील यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर शिराळा येथील रुग्णालयात त्यांच्यावर गेले पाच दिवस उपचार सुरू होते. पहिल्या दोन दिवसात त्यांची प्रकृती उत्तम होती, तदनंतर त्यांना ऑक्सीजन लावला होता, आज प्रकृती खालेवलेवर त्यांना व्हेंटीलेटर लावण्याची गरज निर्माण झालेवर आ. विनय कोरे यांनी कोल्हापूरात व्हेटींलेटर बेडही उपलब्ध करून दिला होता. यासाठी प्रकाश पाटील यांना शिराळा येथून कोल्हापूर येथे आणण्यात आले तथापी हॉस्पीटलच्या दारातच त्यांची प्राणज्योत मालवली. कोरोनाची बाधा झाल्यापासून प्रकाश पाटील सर्वांना मी यातून बरा होतोय काळजीचे कारण नाही असा धीर देत होते. अखेर त्यांना मृत्यूने गाठलेच त्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.
वारणा समूहाचे संस्थापक सहकारमहषी स्व. तात्यासाहेब कोरे यांनी सन १९८९ मध्ये प्रकाश पाटील यांना वारणा व्यायाम मंदीरात वस्ताद म्हणून नियुक्त केल्यापासून अनेक राज्य, राष्ट्रीय स्तरावरील नामांकित मल्ल त्यांनी घडवले वारणा समूहाचे संस्थापक स्व. तात्यासाहेब कोरे यांच्या निधनानंतर त्यांच्या पुण्यतिथी निमीत्त प्रत्येक वर्षी दि.१३ डिसेंबर रोजी वारणानगर ता. पन्हाळा येथे भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान भरवण्यासाठी व ते यशस्वी करणयासाठी वस्ताद प्रकाश पाटील यांचा सिंहाचा वाटा असायचा वारणेतील आतंरराष्ट्रीय मैदानात पाकिस्तान, उजबेगीस्थान,जपान, रशिया, जॉर्जिया यासह अनेक छोट्या मोठ्या राष्ट्रातील पैलवान खेळासाठी येत होतेच शिवाय देशातील ऑलम्पिक विजेते, हिंदकेसरी, राज्य स्तरावरील केसरी किताब पटकावलेले अनेक नामवंत मल्लांनी वारणेच्या कुस्ती मैदानात हजेरी लावत आतंरराष्ट्रीय कुस्त्या खेळल्या आहेत.
वारणेतील आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानामुळे वस्ताद प्रकाश पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा तालीम संघ, महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेवर चांगलाच दबदबा होता. याशिवाय कुस्ती क्षेत्रात देश विदेशात त्यांना ओळखणारे मल्ल निर्माण झाले होते. वस्ताद प्रकाश पाटील यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे प्रकाश पाटील यांच्या जाण्याने कुस्ती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. वारणेतील व्यायाम मंदीर व कुस्ती प्रशिक्षण केंद्रावर शोकसागरात बुडाल्यासारखे दुःख व्यक्त होत आहे.
आ. विनय कोरे यांचे विश्वासू सहकारी
वारणा समूहात आ. विनय कोरे यांचे पर्व सुरू झाले पासुन प्रकाश पाटील हे विनय कोरे यांच्या दौऱ्यात कायम त्यांच्या सोबत असायचे अखेर पर्यन्त ही सोबत त्यांनी टिकवत संपूर्ण कोरे कुंटूबातील सर्वांचाच ते एक भाग कायम राहिले आ. कोरे यांचा विश्वासू सहकारी म्हणून देखील त्यांची सर्वत्र ओळख कायम राहिली.
वस्ताद पाटील यांचे कांदे येथील कुटूंब गावातील पुढारलेले कुटूंब आहे. त्यांचे वडील स्व. राजाराम पाटील हे वारणा साखर कारखान्याचे संचालक होते. सद्या पत्नी शोभा प्रकाश पाटील या श्री.वारणा सह. दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या संचालिका आहेत. त्यांच्या पाश्चात पत्नी दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.