टोप /वार्ताहर
टोप ते किणी टोल नाका दरम्यान सकाळ ते सांयकाळपर्यंत प्रदुषण तपासणी(puc) व्हॅनची वहाने विनापरवान फिरत आहेत. या वाहनांकडून प्रदुषणच्या नावाखाली लूट होत आहे. हा सर्व प्रकार थांबवावा, अशी मागणी दुचाकी वाहनधारकांकडून होत आहे.
टोप व शियेफाटा येथून औद्योगिक वसाहत तसेच शहराकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. यामध्ये दुचाकीचे प्रमाण मोठे आहे. वहान परवाना नुतनीकरण, विम्यासाठी वहान प्रदुषण तपासणी (पीयुसी) प्रमाणपत्र गरजेचे असते. पण त्याला वहानधारकानां नियमापेक्षा दिडपट रक्कम घेतली जाते. अशा घटना टोप, संभापूर फाटा, शियेफाटा येथे बाहेरुन येणारी विनापरवाना मोबाईल व्हॅनमधिल तपासणी केंद्र करतात. तर काही ठिकाणाहुन फक्त फोटोवर हे प्रमाणपत्र दिले जाते. अशामाध्यमातून फिरुन पीयुसी प्रमाणपत्र वाटप करत असतात