प्रतिनिधी/शाहूवाडी
विशाळगड (ता. शाहूवाडी) येथे अल्पवयीन मुलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून दोन्ही संशयित आरोपींना शाहूवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अनिस भाऊद्दीन डेलेकर (वय २४), लियाकत रहीम मुजावर (वय २५, दोघेही रा.विशाळगड, ता. शाहूवाडी) अशी यांची नावे आहेत.
काल, सोमवारी दुपारच्या सुमारास माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली. पिडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार दोन्ही आरोपींविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व विधी कलमान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान पोलिसांनी आरोपींना सोमवारी दुपारी मलकापूर-शाहूवाडी प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कदम, पोलिस निरीक्षक प्रवीण चौगले, सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.