टाेप / वार्ताहर
विश्वविक्रमवीर स्केटर व सायकलिस्ट डाॅ. केदार विजय साळूंखे वय वर्षे अवघे 8 यास ड्रीमगेटर्स या अग्रणी संशोधन आणि विश्लेषक यांचेवतीने देण्यात येणारा आंतरराष्ट्रीय “ग्लोबल किड्स अॅचिव्हर अवॉर्ड्स 2020” या पुरस्काराने मा आभासी पुरस्कार कार्यक्रमात संदीप मारवाह, चीफ स्काऊट ऑफ इंडिया, कु. प्रतिभा प्रह्लाद, क्लासिकल डान्स मधील पद्मश्री अॅवॉर्डी, कु. अंका वर्मा, सीईओ श्री. संदीप सोपारकर, आंतरराष्ट्रीय नृत्य नृत्यदिग्दर्शक आहेत. उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
विश्र्व विक्रमविर डाॅ.केदार साळुंखे यांने अवघ्या सातव्या वर्षी सायकलिगमध्ये एकाच बुकमध्ये एका वेळी चार रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय ठरला. आतापर्यंत स्केटींग व सायकलिग मध्ये 12 विश्वविक्रम नोंदवले आहेत.डाॅ केदार यास वयाच्या सातव्या वर्षी डॉक्टरेट इन ॲथलेटीक्स ही पदवी देऊन द दायसेस ऑफ अशिया चेन्नई तामिळनाडू यांनी सन्मानित करण्यात आले आहे. अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अनेक स्पर्धेत विजेतेपद पटकावली आहेत. यामधे गाेल्ड 20, सिल्वर 16 , ब्राँझ 15 पदक व अन्य बक्षिसे हि मिळवली आहेत
ग्लोबल किड्स ॲचिव्हर्स अवॉर्ड्स २०२० ही त्यांच्या क्षेत्रातील नवीन उंची गाठण्यासाठी केलेली कठोर परिश्रम, समर्पण आणि आवेश ओळखण्यासाठी ड्रीमगेटर्स या अग्रणी संशोधन आणि विश्लेषक कंपनीचा एक पुढाकार आहे.व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर जगभरातील 100 हून अधिक मुलांना ग्लोबल किड्स अॅचिव्हर्स अवॉर्ड्स 2020 प्रदान करण्यात आला.प्रमुख पाहुण्यांनी
‘आमचा विश्वास आहे की मुले ही संपूर्ण जगातील कोणत्याही राष्ट्राचे भविष्य आहेत आणि संपूर्ण समाजात त्याचे सकारात्मक प्रतिबिंब आहे.’ असे मुलाबद्दल गौरव उदगार काढले.
.
डाॅ.केदार साळुंखे याला विबग्याेर स्कुल च्या प्राचार्या स्नेहल नावेॅकर, प्रशिक्षक सचिन इगंवले, स्वप्निल काेळी, वडिल विजय साळूंखे व आई स्वाती गायकवाड साळूंखे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.