जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील
वार्ताहर / हेरले
वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी गावासाठी सुरु केलेली आरोग्य सेवा मोहीम कौतुकास्पद आहे. यासाठी जिल्हा परिषदेकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांनी केले.
हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे प्राथमिक शाळेमध्ये वैश्विक साथ रोखण्यासाठी सकारात्मक मोहिम म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र , मेडिकल असोसिएशन, एमआर असोसिएशन आणि केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत रुग्णवाहिका सुविधा, ताप उपचार केंद्र, आरटीपीसीआर चाचणी व रॅपिड अँटिजन टेस्ट सुविधा या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.
प्राथमिक आरोग्य केंद्र, हेरले, मेडिकल असोसिएशन, मेडिकल प्रतिनिधी असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन यांच्या वतीने प्राथमिक शाळेमध्ये रुग्णांना येण्या-जाण्यासाठी मोफत रुग्णवाहिका, ताप उपचार केंद्र, आरटीपिसीआर चाचणी, रॅपिड अँटिजेन चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये रुग्णांचा ताप व अन्य आजाराची तपासणी केली जाणार असून यामध्ये कोरोना संशयित रुग्ण आढळला तर आरटीपिसीआर किंवा रॅपिड अँटिजेन चाचणी याच केंद्रात करून यामध्ये रुग्णाची पॉझिटिव्ह चाचणी आल्यास त्यांना अतिग्रे येथील कोविड सेंटर मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व विराचार्य संस्थेच्या दोन रुग्ण वाहिकेच्या माध्यमातून भरती करण्यात येणार आहे. ही मोहिम ३१ मे पर्यंत सुरू राहणार आहे. या मोहीमेमुळे गावातील कोरोना संसर्ग आटोक्यात येऊन गाव कोरोना मुक्त होण्यासाठी मदत होणार आहे.
यावेळी उपसरपंच सतीश काशीद, माजी उपसरपंच विजय भोसले, राहुल शेटे ,मुनीर जमादार, राजगोंड पाटील, डॉ राहुल देशमुख, पोलीस पाटील नयन पाटील, तलाठी एस ए बरगाले, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य बटूवेल कदम, दादासो कोळेकर, डॉ. महावीर पाटील, डॉ. अमोल चौगुले, डॉ.प्रविण चौगुले, डॉ. राजगोंड पाटील,डॉ. सुरेखा आलमान,डॉ. इमरान देसाई, डॉ. प्रवीण चौगुले,डॉ. नितीन चौगुले, रजत मुल्ला, विशाल परमाज, श्रेनिक राजोबा, राहुल कराळे, सुरज भोसले, किरण चौगुले, मृणाल पाटील, उमेश पाटील, रोहित मुंडे, पंकज मिरजे, प्रवीण सुतार ,सोमनाथ माने, अमोल शेटे,ओंकार मुंडे ,सौरभ कोरे, प्रकाश कुरणे, स्वप्नील जाधव, वेदू किराणे,संदीप मिरजे, राहुल कारंडे ,सचिन पाटील, राहुल कटकोळे,अश्फाक देसाई, आकाश तिवडे, अनिकेत सूर्यवंशी, केमिस्ट असोसिएशनचे शीतल पाटील, अभिषेक मोहिते,अविनाश चौगुले, अनिल पाटील, संदीप हनमंत,संदीप चौगुले, लतिफ नायकवडी आदी उपस्थित होते.