कोल्हापूर / प्रतिनिधी
पश्चिम घाट आणि कोकण दरम्यानच्या क्षेत्राच्या विकासाच्या संभाव्यतेचा विचार करता कोल्हापूर ते वैभववाडी या रेल्वेमार्गाची उभारणी अत्यंत महत्त्वाची असून या रेल्वेमार्गाचे काम बऱ्याच दिवसापासून प्रलंबीत असल्याने या मार्गास आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन हा मार्ग लवकरात लवकर कार्यान्वीत करावा म्हणून खासदार संजय मंडलिक यांनी रेल्वेराज्यमंत्री नाम. सुरेश अंगडी यांचेकडे निवेदनाव्दारे मागणी केली असता याबाबत लवकरच निर्णय घेवू असे सकारात्मक उत्तर नाम. अंगडी यांनी दिले आहे.
दरम्यान, रेल्वेच्या प्रलंबीत कामासंदर्भात खासदार मंडलिक यांनी कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्ग तत्काळ सुरु करावा, शाहूपुरी भाजी मार्केट येथे फुट ओव्हर ब्रीजकरीता ईलीव्टेर बसवावे, पुणे ते मिरज दरम्यान लोहमार्गाचे डबलींगचे काम पुर्ण झाले असून उर्वरीत मिरज ते कोल्हापूर दरम्यानचे डबलींग चे काम पुर्ण व्हावे, रेल्वेला व्यावसायीक फायद्याच्या दृष्टीने कोल्हापूर ते पुणे दरम्यान प्रवाशांची संख्या जास्त असलेकारणाने कोल्हापूर ते पुणे इंटरसिटी ट्रेन सुरु करुन अस्तित्वातील ट्रेनचा प्रवास योग्य वेळेच्या वेगात वेगवान आंतर-गाडीने सुरु करावी याकरीता निवेदनाव्दारे रेल्वे राज्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री नाम.अंगडी यांनी आपण या सर्व गोष्टींमध्ये व्यक्तीगत लक्ष घालत असून कोल्हापूर रेल्वे संदर्भातील मागण्या प्रामुख्याने पुर्ण करु असे आश्वासन खासदार मंडलिक यांना दिले आहे.