साडेचार महिने बेड होते फुल्ल : 26 व्हेंटीलेटर बेड शिल्लक, 1508 ऑक्सिजन बेड उपलब्ध
कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात, आरोग्य विभागावरील ताण कमी
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असून रूग्ण संख्येतही घट झाली आहे. परिणामी तब्बल साडेचार महिने फुल्ल असणारी व्हेंटिलेटर बेड आता रिकामी होऊ लागली आहेत. कोल्हापूरमध्ये 248 व्हेंटिलेटर बेड असून 26 बेड सध्या शिल्लक आहेत. एकंदरीतच आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट घातक ठरली. मार्च महिन्यांत सुरू झालेली लाटेने मे ते जुलै दरम्यान उग्ररूप धारण केले. रोज 2 हजारहून अधिन नवीन रूग्ण आढळून आले. यामुळे खासगी हॉस्पिटलमधील बेड कमी पडू लागले. गंभिर रूग्णांना व्हेंटिलेटर बेडची गरज भासू लागली. खासगी हॉस्पिटल, सीपीआर आणि कोविड सेंटरमधील व्हेंटीलेटर बेड फुल्ल झाले. यामुळे काही गंभिर रूग्णांना व्हेंटीलेटर बेडसाठी वेटींग करावे लागले.
सध्या कोरोनाची साथ अटोक्यात येत आहे. तब्बल साडेचार महिने फुल्ल असणारे ऑक्सिजन बेड रिकामी होत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होत आहे. ऑक्सिजन बेडही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहेत. महापालिका प्रशासनही दुसरी लाट संपण्याच्या मार्गावर असल्याने आता तिसरी लाट रोखण्यासाठी उपाय योजना करत आहे.
कोरोनावर उपचार करणारी खासगी हॉस्पिटल-63
कोल्हापूर शहरातील कोविड सेंटर-15
एकूण व्हेंटिलेटर बेड-245
कोविड सेंटरमध्ये व्हेंटिलेटर बेड-8
शिल्लक व्हेंटिलेटर बेड-26
रूग्ण असणारे व्हेंटिलेटर बेड-219
एकूण बेड रूग्ण शिल्लक बेड
ऑक्सिजन 2407 899 1508
नॉन ऑक्सिजन 4226 979 3347
आयसीयू 514 342 172
आठ दिवसांत चित्र बदलले
आठ दिवसांपूर्वी सर्व व्हेंटिलेटर बेड फुल्ल होते. आता नवीन रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत आहे. उपचार घेणारे रूग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आठ दिवसांत चित्र बदलले आहे.
साडेचार महिन्यानंतर व्हेंटिलेटरांना ब्रेक
दुसऱ्या लाटेत सतत येणाऱ्या गंभीर रूग्णांमुळे नॉनस्टॉप व्हेंटीलेटरचा वापर झाला. एक रूग्ण उपचार घेऊन बरा झाल्यानंतर त्वरीत व्हेंटिलेटर दुसऱ्याला लावावे लागले. साडेचार महिन्यांनी व्हेंटिलेटरांना ब्रेक मिळाला आहे.