प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात गुरूवारी कोरोनामुळे शहरातील राजारामपुरी तिसर्या गल्लीतील 84 वर्षीय वृद्धाचा खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1 हजार 721 झाली आहे. गेल्या 24 तासांत 15 नवे रूग्ण दिसून आले. 5 जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 766 जणांची तपासणी केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी गुरुवारी दिली.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाने 1,721 जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात 848, नगरपालिका क्षेत्रात 348, शहरात 370 तर अन्य 155 जणांचा समावेश आहे. सध्या 63 सक्रीय रूग्ण आहेत. गुरूवारी दिवसभरात 766 जणांची तपासणी केली. शेंडा पार्क येथील लॅबमधून गुरूवारी 70 जणांचे रिपोर्ट आले. त्यातील 58 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 52 रिपोर्ट आले. त्यापैकी 51 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 124 रिपोर्ट आले, त्यापैकी 112 निगेटिव्ह आहेत. गुरूवारी गेल्या 24 तासांत 5 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 105 झाले. नव्या 15 रूग्णांमुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 49 हजार 889 झाली आहे, अशी माहिती डॉ. माळी यांनी दिली.
पॉझिटिव्ह रूग्ण 15, कोरोनामुक्त 5, कोरोना मृत्यू 1
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण : 49 हजार 889
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण : 48 हजार 105
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण : 63
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी : 1721
गेल्या 24 तासांत 766 संशयितांची तपासणी