टाेप / वार्ताहर
टाेप येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सामाजीक बांधीलकी जपत शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यातील शहिद पोलीस हवालदार संजीत जगताप यांचा काेराेणाने मृत्यू झाला हाेता. त्यांच्या कुटुंबियांना दहा हजार रुपयांची मदत लाेकसहभागातुन दिल्याची माहीती एम.आय.डि.सी.पाेलीस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक किरण भाेसले यांनी माहिती दिली.
काेराेना काळात पाेलीस हवालदार संजीत जगताप यांनी उत्कृष्ट काम केले हाेते. त्यांना काेराेनाची लागण झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. ग्रामपंचायतमध्ये लाेकनिय़ुक्त सरपंच साै.रुपाली तावडे, उपसरपंच शिवाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य नेते तानाजी पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील, श्रीरंग तावडे, डि,एस,पाटील, पदाधिकारी ,ग्रामविकास आधिकारी डि.आर.देवकाते याच्या झालेल्या बैठकित हा निणय घेण्यात आला.त्यानुसार जगताप कुटुंबियांना दहा हजाराची मदत लाेकसहभागातुन देण्यात आली. ही मदत एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांच्याकडे टाेप ग्रामपंचायतीचे कर्मचारी प्रदीप हिरवे व मयूर देसाई यांनी सुपूर्द केली.