वार्ताहर / पुलाची शिरोली
शिये (ता . करवीर) येथील शिये हायस्कूलच्या शेजारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह शिरोली पोलिसांना आढळून आला. अंदाजे 35 ते 40 वयाची हि व्यक्ती आहे. औद्योगिक वसाहती शेजारी रामनगर येथे शिये हायस्कूल कार्यरत आहे.
या हायस्कूलच्या शेजारी अण्णा स्पेअर पार्ट विक्रीचे दुकान आहे. या दुकानाच्या शेजारीच झुडपांमध्ये हि अज्ञात व्यक्ती मयत होवून पडल्याचे तेथील ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती शिरोली पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली व मृतदेहाची पाहणी केली. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत पडलेला असून तो पुरुषाचा आहे. त्याचे वय अंदाजे 35 ते 40 इतके आहे.