प्रतिनिधी/शिरोळ
शिवीगाळ मारहाण करून आपल्यावर जबरदस्ती केली असल्याची फिर्याद पीडित महिलेने काल, रात्री उशिरा दिली. या याप्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, धरणगुत्ती ता. शिरोळ येथे 15 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास संशयित आरोपी प्रदीप बाळासो पाटील व त्याचा मित्र विकी उर्फ अनिल महादेव सुतार (दोघे रा. धरणगुत्ती) हे पीडित महिलेच्या घरी जाऊन तिला मारहाण शिवीगाळ करून तिच्यावर जबरदस्ती करून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले. तसेच प्रदीप पाटील याने अश्लिल कृत्य करण्यास भाग पाडले असल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. या प्रकरणाने परिसरात खळबळ माजली आहे.
संशयित आरोपी प्रदीप पाटील यांचे दोन लग्न झाले असून पीडित महिला त्याची पत्नी आहे. प्रदीप व त्याचा मित्र विकी सुतार याने मारहाण व जबरदस्तीने केल्याने भयभीत झालेल्या पिडीत महिलेने शिरोळ पोलिसात या दोघांच्या विरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी महिला पीएसआय मीनाक्षी माळी यांनी तातडीने याची गांभीर्याने दखल घेऊन प्रदिप पाटील व विकी सुतार या दोघांना अटक केली. या दोघांच्या वर 376 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पीएसआय मीनाक्षी माळी करीत आहेत.