शिरोळ / प्रतिनिधी
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना हा जिल्हात पहिला कोविड सेंटर उभा करणारा ठरला आहे. कारखाना नेहमीच सामाजिक बांधिलकी ठेवून काम करीत आहे. कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील व त्यांच्या सर्व संचालकांनी अल्पावधीतच हे सेंटर उभे करून एक आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आधुनिक कोविड सेंटर उभा करण्यात आला आहे याचे उद्घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते हे करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले की नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच अनेकांना आपला प्राण गमवावा लागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना सेंटर उभे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना हा कोवाड सेंटर उभा करणारा पहिला साखर कारखाना ठरला आहे. या सेंटरमध्ये शंभर बेडचे नियोजन असून पहिल्या टप्प्यात 25 बेडचे विभाग सुरू करण्यात आले आहे. या कोविड सेंटरमध्ये सर्व सुविधेबरोबरच अनुभवी डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांची निवृत्ती करण्यात आले असून या परिसरातील नागरिकांना याचा लाभ होईल असा विश्वासही त्यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला.
या कार्यक्रमास दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, संचालक निजामसो पाटील भैया, महेंद्र बागी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील, तहसीलदार अपर्णा मोरे, धुमाळ गट विकास अधिकारी शंकर कवितके धनाजीराव जगदाळे, धनाजी पाटील, शेती अधिकारी श्रीशैल हे गाना तालुका वैद्यकीय अधिकारी पी एस दातार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.