मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या २५ जणांवर गोकुळ शिरगाव पोलिसांची कारवाई
वार्ताहर / गोकुळ शिरगाव
जिल्ह्यात संचारबंदी असताना उजळाईवाडी विमानतळ रोडवर सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या मुले व महिला अशा सुमारे २५ जणांवर गोकुळ शिरगाव पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली.
कोल्हापूरमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली आहे. जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश असतानाही नागरिक बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. संचारबंदी असतानाही नागरिक दररोज मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडत आहेत.
आज सकाळी उजळाईवाडी विमानतळ रोडवर गोकुळ शिरगाव पोलिसांनी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करुन मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या सुमारे २५ जणांवर कडक कारवाई केली. शिवाय प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड आकारला. यावेळी सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रवीण पाटील, पीएसआय रविकांत गच्चे व त्यांचे सहाकार्यांनी ही कारवाई केली. यावेळी डीवायएसपी आर. आर.पाटील यांनी भेट दिली.