84 नवे रूग्ण, 728 कोरोनामुक्त, 6 कोरोना बळी,
कागल, शिरोळ, गडहिंग्लज, राधानगरी, गगनबावडा तालुक्यात नव्या रूग्णाची नोंद नाही.
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने 6 जणांचा मृत्यू झाला तर 84 नवे रूग्ण समोर आले. दिवसभरात 728 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 42 हजार 865 झाली आहे. सध्या 2 हजार 758 कोरोना रूग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 365 संशयितांची तपासणी केली. त्यापैकी 143 जणांची अँटीजेन टेस्ट केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली. कागल, शिरोळ, राधानगरी, गडहिंग्लज, गगनबावडा तालुक्यात शुक्रवारी नवा रूग्ण नोंद झालेला नसल्याचे आरोग्य विभागातून स्पष्ट करण्यात आले.
जिल्ह्यात शुक्रवारी सीपीआर, केअर सेंटरमध्ये 365 जणांची तपासणी केली. सध्या 2 हजार 758 रूग्ण उपचार घेत आहेत. शेंडा पार्क येथील लॅबमधून 507 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 474 निगेटिव्ह तर 29 पॉझिटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 143 रिपोर्ट आले. त्यापैकी 10 पॉझिटिव्ह आहेत.
जिल्ह्यात कोरोनाने 6 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सीपीआर हॉस्पिटलमध्ये अब्दुललाट शिरोळ येथील 45 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. इचलकरंजीतील आयजीएम हॉस्पिटलमध्ये पुलाची शिरोली एमआयडीसीतील 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयात उंगोर गडहिंग्लज येथील 70 वर्षीय महिलेचा तर खासगी हॉस्पिटलमध्ये उजळाईवाडी करवीर येथील 70 वर्षीय पुरूष, सांगोला सोलापूर येथील 65 वर्षीय महिला आणि रामानंदनगर कोल्हापूर येथील 72 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
कोरोनाने आजपर्यत 1 हजार 588 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ग्रामीण भागात 770, नगरपालिका क्षेत्रात 333, महापालिका क्षेत्रात 353 तर अन्य 132 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 728 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 42 हजार 865 झाली आहे. आजरा 3, भुदरगड 4, चंदगड 2, हातकणंगले 7, करवीर 16, पन्हाळा 1, शाहूवाडी 1, नगरपालिका क्षेत्रात 14, कोल्हापूर शहर 28 आणि अन्य 8 असे 84 रूग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
पॉझिटिव्ह रूग्ण 84, कोरोनामुक्त 728, कोरोना 6 मृत्यू
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण : 47 हजार 211
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण : 42 हजार 865
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण : 2 हजार 758
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी : 1588